सात दशकांनी भारतात परतला चित्ता !

ग्वाल्हेर-वृत्तसंस्था | तब्बल सात दशकांनी भारतातून नामशेष झालेला चित्ता पुन्हा देशात परतला आहे. नामिबियातून आठ चित्ते आज सकाळी देशात दाखल झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून लागलेली उत्सुकता शिगेला पोहचली असतांनाच आज देशात आठ चित्त्यांचे आगमन झाले आहे. नामिबिया या देशातून आठ चित्ते भारतात आणण्यात आले असून यात पाच नर आणि तीन माद्यांचा समावेश आहे. विशेष विमानाने आज मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे हे चित्ते आले आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून त्यांच्याच हस्ते या चित्त्यांना मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानातील संरक्षक क्षेत्रात सोडण्यात येणार आहे. या चित्त्यांना विशेष सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत.

Protected Content