चिंचोली येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिंचोली येथील सार्वजनिक माध्य. व उच्च माध्य. (व्यवसाय अभ्यासक्रम विभाग) विद्यालयात इयत्ता १o वी व १२वींच्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संवाद साधण्याची संधी मला मिळाली ,मुलांच्या मनातील परीक्षेची भीती तसेच इंग्रजी विषयाचा न्यूनगंड दूर करण्यासाठी टीप्स दिल्या तसेच अनुक्रमांक आणि परीक्षेतील गुण यांचे व्यावहारिक महत्त्व सध्या काय आहे हे पटवून सांगण्याचा प्रयत्न डॉ कुणाल सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना केला ..दहावी आणि बारावी नंतर कोणत्या संधी आहेत, त्यांचा अभ्यासक्रम कोणता, विविध करिअर क्षेत्र याची थोडक्यात माहिती सांगितली, परीक्षा हॉलमधली मानसिकता ,स्वतःवरचा विश्वास या सगळ्या बाबी समजून सांगून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.कुणाल सोनवणे यांनी स्पर्धा परीक्षेविषयी मुलांना मार्गदर्शन केले.स्पर्धा परीक्षा करत असताना आपल्याजवळ आपला प्लॅन बी तयार असावा तसेच एका मर्यादेपर्यंत प्रयत्न करावे आणि चांगले व्यावसायिक किंवा उद्योजक हे सुद्धा एक चांगलं करिअर आहे. हे मुलांना समजून सांगितलं तसेच स्वतःच्या जीवनप्रवासातून मुलांना प्रेरित केले.

चिंचोली गावातील मूळ आणि सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप सोळुंके यांनी देखील मुलांना पोलिस प्रशासनातील विविध अनुभव तसेच आपल्या महाविद्यालयातील अनिल साठे सोबतच्या जुन्या आठवणींना सांगितल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कुणाल सोनवणे ( फैजपुर उपविभागीय पोलिस अधिकारी) हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रदिप सोळुंके साहेब (सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक बुलढाणा) तसेच संदीप सोनवणे (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक) , प्रदीपकुमार सोनवणे , (केंद्रप्रमुख, डांभुर्णी केंद्र) व शालेय समिती चेअरमन अनिल दंगलराव साठे हे उपस्थित होते.

उच्च माध्यमिक व्यवसाय विभागाचा इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी विभागाचा माजी विद्यार्थी यशस्वी उद्योजक (रेशीम उद्योग) समाधान पाटील किनगाव, गावातील प्रतिष्ठित नागरिक विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक केले.

या कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य पी. जी. शिंदेसर पर्यवेक्षक ए. एफ. पाटीलसर व इतर शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनी-विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री आर. पी. रावतेसर यांनी केले.

 

Protected Content