फिर्याद मागे घ्यावी म्हणून मारहाण : तीन तृतीयपंथियांसह माय-लेकावर गुन्ह दाखल

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रेम विवाहाला विरोध म्हणून भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याची फिर्याद मागे घ्यावी म्हणून त्यांच्यासह कुटुंबियांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी तीन तृतीयपंथियांसह माय-लेकाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात भगवान गंगाधर आव्हाड (वय ३६ रा. धंदा नोकरी हातगांव ता.चाळीसगांव) यांनी फिर्याद दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, आपण हातगाव येथे  वडील गंगाधर रामचंद्र आव्हाड आई सौ.कृष्णाबाई गंगाधर आव्हाड पत्नी सौ. रत्ना भगवान आव्हाड मुलगी चैताली भगवान आव्हाड, बहीण सुनिता संतोष दराडे ,भाची कोमल संतोष दराडे वय १४ वर्षे अशांसह राहतो. आपण एस.टी.डेपो, भिंवडी जिल्हा ठाणे येथे सुमारे ०६ वर्षापासुन चालक म्हणुन नोकरीस आहे. दरम्यान, मनमाड येथिल राहणारे सिमा संजय ताट ही आपली बहिण असून विशाल संजय ताटे हे मेहुणे आहेत. त्यांच्या परीचयातील मुस्कान उर्फ दुर्गा शेख ( तृतीयपंथी ) व रुबिना शेख ( तृतीयपंथी ) अशांना ओळखतो.

 

आपण ०८ डिसेंबर २०१७ रोजी रत्ना साहेबराव जाधव हिच्या सोबत प्रेम विवाह केला असुन सदर विवाहाला माझी बहीण सिमा संजय ताटे हिचा विरोध आहे. यातून सिमा संजय ताटे तिचा मुलगा विशाल संजय ताटे व तिचे सोबत राहणारा मुस्कान उर्फ दुर्गा शेख (तृतीयपंथी ) यांनी यापुर्वी हातगांव येथे येऊन माझी पत्नी सौ. रत्नाबाई भगवान आव्हाड हिला जातीवाचक शिवीगाळ केली होती त्यामुळे तिने त्याचे विरुध्द दिनांक ०६/०२/२०२२ रोजी चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार दिलेली आहे.

 

या अनुषंगाने  दिनांक २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ०३.०० ते ०३.३० वाजेच्या दरम्यान आपल्यासह वडील गंगाधर रामचंद्र आव्हाड, आई सौ.कृष्णाबाई गंगाधर आव्हाड, पत्नी सौ. रत्ना भगवान आव्हाड, मुलगी चैताली भगवान आव्हाड, भाची सुनिता संतोष दराडे व कोमल संतोष दराडे वय १४ वर्षे असे घरी होते. यावेळी घरासमोर बहीण सिमा संजय ताटे तिचा मुलगा विशाल संजय ताटे व सोबत राहणारे तिचे मित्र मुस्कान उर्फ दुर्गा शेख ( तृतीयपंथी ), रुबिना शेख ( तृतीयपंथी ) ,गौरी ( तृतीयपंथी ),लक्ष्मी शेख ( तृतीयपंथी ),माईन शेख ( तृतीयपंथी ) सर्व रा. मनमाड असे एका स्विफ्ट गाडी मध्ये माझ्या घरासमोर आले व गाडी खाली उतरुन माझी बहीण सिमा संजय ताटे व तिच्या  सोबत राहाणारा मुस्कान उर्फ दुर्गा (तृतीय पंथी) यांनी तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले. यानंतर बहिणीचा मुलगा विशाल संजय ताटे याने त्याचे हातातील कोयत्याने माझ्या डोक्यावर वार केले. तोच कोयता पुन्हा बहीण सिमा ताटे हिने मागील बाजुस मारुन दुखापत केली त्यानंतर तिने त्याच कोयत्याने माझ्या उजव्या हातावर मारुन गंभीर दुखापत पोहचवली.त्यानंतर माझी आई सौ.कृष्णाबाई आव्हाड हिला मुस्कान उर्फ दुर्गा शेख  हिने तिचे केस पकडुन तिच्या हातातील लाकडी दांड्याने तिच्या पायाला मारहाण केली व माझी बहीण सिमा हिने माझ्या आईस लाकडी दांड्याने तिच्या उजव्या हाताला मारहाण करुन गंभीर दुखापत पोहचवली विशाल संजय ताटे याने माझ्या आईच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर तलवारीने वार करुन गंभीर दुखापत पोहचवली.वडील गंगाधर रामचंद्र आव्हाड यांना मुस्कान शेख (तृतीयपंथी), सिमा ताटे, रुबिना शेख (तृतीयपंथी) अशांनी मिळुन लाकडी काठ्यांनी ,बहीण सुनिता संतोष दराडे हिस सिमा ताठे व तिचा मुलगा विशाल ताठे अशांनी कपाळावर मारुन दुखापत केली.

 

तर गौरी बागडे,लक्ष्मी शेख,माईन शेख अशांनी मला तसेच माझी पत्नी सौ.रत्नाबाई हिला काठ्यांनी मारहाण केली त्यानंतर मी आमचे गावातील अरुण गंगाधर धात्रक यांचे घरी जाऊन त्याचे घरामध्ये  जाऊन लपलो.तेव्हा माझी बहीण सिमा संजय ताटे व तिचे सोबत संजय ताटे, मुस्कान उर्फ दुर्गा शेख (तृतीयपंथी ), रुबिना शेख ( तृतीयपंथी )गौरी बागडे,लक्ष्मी शेख,माईन शेख असे तलवारी घेऊन माझ्या पाठीमागे आले व मी लपलेल्या अरुण धात्रक यांचे दरवाज्याला लाथा मारुन मला जिवे मारण्याची धमकी देऊ लागले.तसेच वरील सर्वांनी माझे घरातील टि.व्ही.फोडला,माझे वडीलांची नोटार सायकल देखील तोडुन फोडुन नुकसान करुन त्यानी आणलेल्या स्विफ्ट गाडी मध्ये बसुन निघुन गेले.त्यानंतर मी तसेच वडील गंगाधर रामचंद्र आव्हाड आई कृष्णाबाई गंगाधर आव्हाड पत्नी सौ. रत्ना भगवान आव्हाड मुलगी चैताली भगवान आव्हाड बहीण सुनिता संतोष दराडे , भाची कोमल संतोष दराडे वय १४ वर्षे असे चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन ला आलो त्या ठिकाणी पोलीसांनी औषधोपचाकामी मेडीकल मेमो देऊन चाळीसगांव ग्रामीण रुग्णालयात पाठविले त्या ठिकाणी डॉक्टरांनी आमच्या वर प्रथोमोपचार करुन आम्हाल पुढील औषधोपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल धुळे येथे रेफर केले त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी औषधोपचार घेतले.

 

या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिमा संजय ताटे, विशाल संजय ताटे, मुस्कान उर्फ दुर्गा शेख (तृतीयपंथी), रुबिना शेख ( तृतीयपंथी ); गौरी बागडे,  लक्ष्मी शेख,  माईन शेख ( तृतीयपंथी ) सर्व रा. मनमाड  यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. या सर्वांच्या विरूध्द भादंवि कलम ३२४, ३२६, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे  हे करीत आहे.

Protected Content