मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आज जिल्हा दौर्‍यावर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

आज पाचोरा येथील एम.एम. कॉलेजच्या मैदानावर शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील, ना. दादा भुसे, ना. उदय सामंत, ना. अब्दुल सत्तार, खासदार उन्मेषदादा पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार लताताई सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प. सीईओ अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

आमदार किशोरआप्पा पाटील यांनी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून याची अतिशय जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. दरम्यान, या कार्यक्रमासोबत नांद्रा येथील खासगी कंपनीचे उदघाटन आणि भडगाव तालुक्यात एमआयडीसीचे भूमीपुजन या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. तर, यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सांत्वनासाठी पाळधी (ता. धरणगाव) येथे जाणार आहेत.

Protected Content