…अखेर आरबीआयनेही माझ मत मान्य केले – राहुल गांधी

नवी दिल्ली- ज्या बाबींची चेतावनी मी देतो होतो, त्याची पुष्टी आरबीआयनेही केल्याचे नमूद करत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

अर्थव्यवस्था पूर्ण ताकदीने पुन्हा रुळावर येण्यासाठी मलमपट्टी करून चालणार नाही. त्यासाठी व्यापक आर्थिक सुधारणा कराव्या लागतील, असे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने मंगळवारी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी म्हणाले कि, ज्या गोष्टीची चेतावणी मी मागील अनेक महिन्यांपासून देत ​​होतो. त्याची पुष्टी आता आरबीआयनेही केली आहे. सरकारने आता कर्ज देण्याची नाही तर जास्त खर्च करण्याची गरज आहे. उद्योगपतींचे कर्ज माफ करण्याऐवजी गरिबांना पैसे द्या.

माध्यमांचे लक्ष विचलित केल्याने गरिबांना मदत होणार नाही आणि आर्थिक आपत्तीही नाहीशी होणार नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आरबीआयचा एका अहवालही शेअर केला आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे देशातील आणि परदेशातील अर्थव्यवस्था कोसळल्या आहेत. त्याचबरोबर लस नेमकी कधी उपलब्ध होणार याचा अंदाज कोणालाही नसल्यामुळे जागतिक पातळीवरील संदिग्धता कायम आहे. यातून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने रुळावर येण्यासाठी विविध क्षेत्रांत व्यापक सुधारणा कराव्या लागतील, असे रिझर्व्ह बॅंकेच्या वार्षिक अहवालात म्हटले होते.

Protected Content