पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील कन्हेरे शिवारातील शेतात ३५ वर्षीय महिलेचा पाठलाग करून विनयभंग केला. एवढेच नाही तर फोटो समाजात व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील कन्हेरे गावात ३५ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार ४ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान गावात राहणारा समाधान रमेश पाटील याने महिलेचा पाठलाग केला. त्यानंतर महिलेचा हात पकडून अश्लिल चाळे करत विनयभंग केला. दरम्यान महिलेने हटकले असता संशयित आरोपी समाधान पाटील याने मी तुझे काढलेले फोटो लोकांना दाखवून बदनामी करेल अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने थेट पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी समाधान पाटील याच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोाहेकॉ नाना पवार हे करीत आहे.