चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आजपासून जळगाव जिल्हा दौर्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पहाटे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आजपासून दोन दिवस जळगाव जिल्हा दौर्यावर आहेत. यात ते पक्षाच्या सुपर वॉरियर्स सोबत संवाद साधणार आहेत. यासोबत ते संपर्क से समर्थन या उपक्रमाच्या अंतर्गत जनतेशी संवाद साधणार आहेत. आज पहाटे चाळीसगावमार्गे ते जिल्ह्यात दाखल झाले. याप्रसंगी त्यांनी पहिल्यांदा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिले.
येथे आ. चंद्रशेखर बावनकुळे यांची जंगी स्वागत करण्यात आले. प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याला वंदन केले. यानंतर ते शिवालय या आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवासस्थानी दाखल झाले. आमदार चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवतींनी श्री बावनकुळे यांचे स्वागत केले. त्यांनी चव्हाण कुटुंबासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.