धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीणमधील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा आज सकाळी टहाकळी व फुलपाट गावात प्रचार दौरा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी टहाकळी व फुलपाट गावचे सरपंच, ग्रा.पं.सदस्य, तसेच राकेश नन्नवरे, नांदेड-साळवा-बांभोरी गटातील शक्ति प्रमुख अधिकार पाटील, बूथ प्रमुख नारायण चौधरी तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.