मोटारसायकलच्या डिक्कीतून ६० हजार लांबविले

धरणगाव प्रतिनिधी । मोटारसायकलच्या डिक्कीतून ६० हजार रूपये लाबंविल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, पितांबर चैत्राम पाटील हे तालुक्यातील पष्टाणे येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये सचिव म्हणून कार्यरत असून ते शहरातील संभाजी नगर भागात राहतात. २१ रोजी सकाळी त्यांनी शहरातील स्टेट बँकेतून ५० हजार रूपये काढले. येथून ते जेडीसीसी बँकेत केले. यानंतर त्यांनी एटीएममध्ये बॅलन्स चेक केला. यानंतर ते आपली एमएच १९ -एक्यू ५१८८ क्रमांकाच्या दुचाकीजवळ आले असता त्यांना प्लग वायर काढून स्वीचमध्ये बारीक खडे टाकलेले आढळून आले. यामुळे ते गॅरेजवर दुरूस्तीसाठी आले असता त्यांना आपल्या डिक्कीतील बँकेतले ५० हजार आणि घरून आणलेले १० हजार असे एकूण ६० हजार रूपये गायब झाल्याचे दिसून आले. पितांबर पाटील यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content