पुनर्वसितांच्या मदतीला आ. चंद्रकांत पाटलांची धाव : बैठकीतून प्रशासनाला निर्देश

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कांडवेल येथील पुनर्वसित ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीची आढावा बैठक घेऊन प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिलेत.

कांडवेल येथील पुनर्वसित भागातील ग्रामस्थांची कधीपासूनच समस्या आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना व्यथा सांगितल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने आज पुनर्वसन टप्पा क्र. ३ संदर्भात कांडवेल येथे ग्रामस्थ तसेच संबंधित अधिकारी वर्ग यांच्या सोबत संयुक्त बैठक घेतली.

या आढवा बैठकीत कांडवेल गावातील नागरी सुविधाही कामे तात्काळ मार्गी संदर्भात अधिकारी वर्गास त्यांनी सूचना दिल्यात. तुम्हा नागरिकांची सेवा करण्यासाठी मी अधिकाधिक प्रयत्नशील असून नवीन विकासकामे मंजूर करून ते देखील लवकरच पूर्णत्वास घेऊन जाणार असे ग्रामस्थांना सदरील बैठकीत आश्वासीत केले. या अनुषंगाने पुनर्वसित भागात विकासकामे तात्काळ सुरू करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. यामुळे या भागातील ग्रामस्थांना खर्‍या अर्थाने दिलासा मिळणार आहे.

यावेळी तहसीलदार बंडू कापसे, पुनर्वसन विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती.कुलकर्णी मॅडम, उपअभियंता श्री. बागुल, महावितरण चे योगेश महाजन, सरपंच सौ. जयश्री पाटील, उपसरपंच विनोद कोळी तसेच ग्रा.पं. सदस्य व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content