समान नागरी कायद्याला मुस्लिम समाजाचा विरोध

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समान नागरी कायद्यालयात जळगाव शहरातील मुस्लिम संघटनांनी विरोध केला असून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करू नये अशी एक मुखी मागणी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. मागणीचे निवेदन तहसीलदार विजय बनसोडे यांना शुक्रवारी २३ जून रोजी दुपारी देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सरकार समोर प्रस्तावित समान नागरी संहितेची रूपरेषा देण्यात आले आहे. समान नगरी कायदा हा शरिया व कौटुंबिक कायद्याशी अनेक बाबतीत विरोधाभास करत असल्यामुळे मुस्लिमांना ते धार्मिक दृष्टिकोनातून पूर्णपणे अस्वीकार्य आहे. शिवाय देशाच्या हिताचे नाही, कारण भारत हा विविध धर्म आणि विविध परंपरांचा संग्रह आहे आणि ही विविधता हेच त्याचे सौंदर्य आहे. ही विविधता नष्ट करून त्यांच्यावर एकच कायदा लादला गेला तर त्याचा राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समान नागरी कायदा ची अंमलबजावणी करू नये अशी एक मुखी मागणी शुक्रवारी २३ जून रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहरातील विविध मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन विधी आयोगाचे अध्यक्ष यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत लिखित स्वरूपात सादर करून आपला विरोध नोंदविला आहे. सदर निवेदन आस्थापनाचे तहसीलदार विजय बनसोडे यांना देण्यात आले आहे.

याप्रसंगी मनियार बिरादारीचे फारूक शेख, कुलजमातीचे सैयद चाँद, अतिक अहेमद, मझर पठाण, सलीम इनामदार, बाबा देशमुख, अमजद पठाण, खालिद खाटीक, सईद शेख, जाकीर पठाण, अनिस शहा, अन्वर खान, फिरोज शेख, नूरखान, नाझीम पेंटर मतीन पटेल, शिबान अहेमद, दानिश खाटीक यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content