चटाई कंपनीसह ईलेक्ट्रीक दुकान फोडले!; ७७ हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील भाग्यश्री ॲण्ड संकेत चटई कंपनी आणि महालक्ष्मी इलेक्ट्रिक दुकानातून ७७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे शनिवारी उघडकीला आले आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती अशी की, जळगाव एमआयडीसीतील भाग्यश्री अॅण्‍ड संकेत चटई कंपनी आणि त्यांच्याच बाजूला असलेली हेमंत काशिनाथ बऱ्हाटे यांचे महालक्ष्मी इलेक्ट्रिक दुकान हे दिवाळीनिमित्त गेल्या सात दिवसांपासून बंद आहे. कंपनी आणि दुकान बंद असल्याचा फायदा घेत शुक्रवारी १७ नोव्हेंबर रात्री १० वाजेपासून ते १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान चटाई कंपनी व दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत इलेक्ट्रिक मोटारी, वेल्डिंग वायर केबल, ग्राइंडर मशीन, छोटी गॅस हंडी, कुलरच्या मोटारी, वेल्डिंग ट्रांसफार्मर, कॉपरच्या वाइंडिंग तार व इतर सामान असा एकूण ७७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भाग्यश्री ॲण्ड संकेत चटाई कंपनीचे संचालक परविन अशोक भारती यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुंडे करीत आहे.

Protected Content