पाचोरा शहरात रेल्वे प्रशासनातर्फे जनजागृती मोहीमे अंतर्गत मोटरसायकल रॅली (व्हिडिओ)

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रेल्वे प्रशासनातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जनजागृती मोहीम अंतर्गत आज दि. ११ जुलै रोजी पाचोरा रेल्वे स्थानकावरुन आर. पी. एफ. जवानांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भुसावळ मंडळ येथुन दि. १ जुलै २०२२ पासुन रेल्वे प्रशासनाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेस डी. आर. एम. यांनी हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ केला असुन ही मोहिम खंडवा, बुऱ्हाणपूर, मलकापुर, अमरावती, शेगाव, बडनेरा असे भ्रमण करुन आज दि. ११ जुलै रोजी पाचोरा रेल्वे स्थानकावर येवुन ठेपली. या मोहिमेचा मुळ उद्देश म्हणजे भारतीय रेल्वे ही सर्व सामान्यांची जननी असून रेल्वेमध्ये प्रवास करतांना प्रवाशांनी योग्य ती काळजी घ्यावी, विनाकारण कोणास काही त्रास होवु नये याची दक्षता घ्यावी, रेल्वे लाईन क्रास करतांना योग्य ती दक्षता घ्यावी, रेल्वे कर्मचाऱ्यां सोबत नेहमी सहकार्याची भावना ठेवावी. याच उद्देशाने ही मोटरसायकल रॅली मोहिम हाती घेण्यात आल्याची माहिती आय. पी. एफ. बेनीप्रसाद मिना यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. रॅली ही रेल्वे स्थानकावरुन छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजे संभाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, रेल्वे उड्डाणपूल, बस स्थानक रोड ते रेल्वे स्थानकापर्यंत काढण्यात आली. या मोटरसायकल रॅलीत आय. पी. एफ. बेनीप्रसाद मिना, एस. आय. गणेश कुमारवत, प्रकाश थोरात, हेड कॉन्स्टेबल श्रीनिवास, राजेश पवार, वसिम शेख, काॅन्स्टेबल दिपक शिरसाट, धीरज कुमार, नविन चहल, दिवेंद्र कुमार, जी. आर. फोगाट, नागेश धनवटे, पाचोरा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक एस. टी. जाधव, पाचोरा आर. पी. एफ. चे सब इन्स्पेक्टर श्रीकांत चौधरी, ए. एस. आय. बी. पी. द्विवेदी, हेड कॉन्स्टेबल के. एम. शर्मा, गणेश पवार सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/453991479877309

Protected Content