
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रकांत भाऊलाल पाटील यांची निवड करण्यात आली. दि. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत सभेत गुप्त पद्धतीने निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीस एकूण १६ सदस्य उपस्थित होते, ज्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी ९ मते मिळवत विजय मिळवला, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार संगीता संभाजी पाटील यांना ८ मते मिळाली. या निवडीसाठी वडील भाऊलाल नामदेव पाटील यांचे आशीर्वाद लाभल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानानंतर सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली. यात चंद्रकांत पाटील विजयी ठरले असल्याचे अधिकृतपणे घोषित करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान सरपंच मीनाबाई पाटील, ग्रामविकास अधिकारी जयपाल चिंचोरे, यांनी कामकाज पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्रावण कोळी, यमुनाबाई ठाकरे आणि अश्विनी वाल्मीक पाटील यांच्या यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांच्या विजयाबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. ग्रामस्थ हिम्मत पाटील, मयूर भाऊलाल पाटील, निलेश पाटील, लक्ष्मण बापू पाटील, झुंबरसिंग पाटील, शिवाजी पाटील, वाल्मीक पाटील आदींनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले. या निवडीमुळे गावाच्या विकासकार्यात अधिक गती येईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.



