चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांचे प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण

chalisgaon uposhan

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील २२ खेड्यांचा सिंचन, पिण्याच्या पाणी प्रश्न असलेल्या मन्याड धरणाची उंची वाढवावी तसेच अनेक वर्षांपासुन प्रलंबीत असलेली नारपार योजना मार्गी लावावी, या मागण्यासाठी शेतकरी, ग्रामस्थ, रयत सेना व परीसरातील स्थानिक लोकप्रतिनी व पक्षांचे कार्यकर्ते ५ ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील २२ खेड्यांचा पिण्याचे पाणी व सिंचनाचे जनजिवन मन्याड धरणावर अवलंबुन आहे. मात्र त्याची उंची कमी असल्याने पाणीसाठा कमी होतो. त्या धरणाची उंची वाढल्यास त्याचा फायदा २२ खेड्यांना होणार आहे. मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली येईल व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल तसेच अनेक वर्षांपासुन नारपार योजना प्रलंबीत आहे. याबाबत माजी आमदार राजीव देशमुख तसेच आमदार उन्मेश पाटील यांनी ही योजना मार्गी लावण्यासाठी विधानसभेत पाठपुरावा देखील केला होता. मात्र ही योजना अद्याप प्रलंबीत आहे.

मन्याड धरणाची उंची वाढवुन प्रलंबीत असलेली नारपार योजना मार्गी लावावी यासाठी वेळोवेळी संबंधीत २२ खेड्यातील शेतकरी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी, पाटबंधारे उपविभाग, तहसिल कार्यालय चाळीसगाव, खासदार व मुख्यमंत्री यांना निवेदन देवुन मागणी केली होती व मागणी मान्य न झाल्यास ५ ऑगस्ट रोजी चाळीसगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोसणास  बसणार असल्याचा ईशारा देण्यात आला होता पण मागण्या मान्य झाल्या नाहीत. या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहे.

उपोषणात यांचा सहभाग
तमगव्हाणचे माजी सरपंच किशोर पाटील, तमगव्हानचे जगदीश पाटील, धनराज पाटील, निलेश पाटील, मुकुंदा पाटील, राजेंद्र पाटील, माळशेवगेचे दिपक पाटील, सिताराम पाटील, संदीप पाटील, शेवरीचे जितेंद्र चौधरी, देवळीचे छगन जाधव ,  तांबोळेचे डी.ओ.पाटील, संजय पाटील, रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्यासह  २२ खेड्यातील शेतकरी, ग्रामस्थ व परीसरातील विविध पक्षांचे स्थानिक लोकप्रतिनीधी व रयत सेनेचे पदाधिकारी चाळीसगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

यांनी दिल्या भेटी
यावेळी उपोषणास माजी आमदार राजीवदादा देशमुख, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पत्रकार प्रफुल्ल साळुंखे, बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील, उपसभापती महेंद्र पाटील, जि.प. सदस्य अतुल देशमुख, शशिकांत साळुंखे, भूषण पाटील, पं.स. सदस्य अजय पाटील, विष्णु चकोर, माजी जि.प. सदस्य मंगेश पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, आडगाव माजी सरपंच प्रकाश पाटील, नगरसेवक दिपक पाटील, माळशेवगे सरपंच डिगांबर मोरे, शेवरीचे जितेंद्र चौधरी, विलास पाटील, तमगव्हाण चे राजेंद्र पाटील,   अदिनी भेटी दिल्यात.

Protected Content