गळफास घेऊन मजुराने संपविली जीवनयात्रा

चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील बहाळ येथील ४६ वर्षीय मजुराने बाभळाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील बहाळ येथील अस्संबर सदा मोरे (वय- ४६ रा. बहाळ ता. चाळीसगाव) यांनी गिरणा नदीच्या काठी असलेल्या बावरा नाले येथील बाभळाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवार रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अस्संबर मोरे हा हातमजूरी करायचा. त्यातून हाती येणारे दोन पैशातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह तो करीत होता. दरम्यान मोरे यांच्या मयताचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. तिघा मुलींचे लग्न झाल्यामुळे मोरे यांच्या पाश्चात्य पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. या संदर्भात वाल्मिक दिगंबर मोरे (रा. बहाळ) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव मेहूणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास प्रताप मथूरे हे करीत आहेत.

Protected Content