Home Cities चाळीसगाव चाळीसगाव येथे वृक्षारोपणासह पर्यावरण जनजागृती मोहिम

चाळीसगाव येथे वृक्षारोपणासह पर्यावरण जनजागृती मोहिम

0
140

purnpatre vidyalay

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील डॉ. प्रमिलाताई पूर्णपात्रे विद्यालयात महिला मंडळ स्टेशन विभागाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पर्यावरण जागृतीसह विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.

वृक्षारोपण कार्यक्रम मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी पुर्णपात्रे यांच्याहस्ते करण्यात आले. झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा असा संदेश मुलांना त्यांनी दिला. कार्यक्रमाला मंडळाच्या सचिव प्रिती शुक्ल, माजी अध्यक्ष संगिता सोनटक्के, शोभा अग्रवाल, डॉ. मिनल माळी यांनी ही वृक्षारोपण करुन झाडाचे महत्व सांगितले.

डॉ. पुर्णपात्रे यांचा सत्कार
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्षा डॉ. हेमांगिताई पुर्णपात्रे ह्या होत्या. यावेळी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. शुभांगिताई पुर्णपात्रे यांची महिला मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश सोनवणे यांनी केले. तर सुत्रसंचालन योगेश साळुंखे यांनी केले. मुलांनी केलेली भाषणांचे अध्यक्षा डॉ.हेमांगिताई पुर्णपात्रे यांनी कौतुक करुन मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रयाच्या यशस्वीतेसाठी पवार सर, दाभाडे सर, राजेंद्र वराडे, वैशाली पाटिलं, नेहा पाटिल, लता निकम, सचिन पवार, काशिनाथ जाधव, उदय देशपांडे, सुरेश काटकर यांनी परीश्नम घेतले.


Protected Content

Play sound