चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सवलतीच्या किमतीत सोलर युनिटचे आमीष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणार्याला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिनांक १९/०७/२०२१ रोजी फिर्यादी प्रविण शरद जाधव, ( वय-३५, धंदा-शेती, रा. करजगांव, ता. चाळीसगाव) यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की, मोबाईल क्रमांक ९५२९३७६६३६ धारक रितेश कुमार सिंग नामक व्यक्तीने व्हाटूसअप गृपद्वारे २,५०,०००/- रुपये किमतीचा सोलर पंप ९०% सबसिडी कापून २५,०००/- रुपयांना मिळेल अशा आशयाची जाहिरात करुन व्हाट्स गृपच्या माध्यमातून फिर्यादी वतर शेतकर्यांकडून त्याचे समृध्दी सोलर या नावाच्या बनावट खात्यामध्ये ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करुन घेऊन फिर्यादी व इतर शेतकर्यांना कोणताही प्रकारे सोलर पंप न देता त्यांची ६५,०००/- रुपयांची फसवणूक केली आहे. सदर गुन्ह्यात आरोपीने बनावट कागदपत्रे देऊन महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा चाकण येथे समृध्दी सोलर या नावाने बनावट खाते उघडले होते. आरोपीचा गुन्ह्यात कोणत्याही प्रकारे मागमृ्स नसतांना ग्रामीण पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे बनावट खाते उघडणाऱा आरोपी निष्पन्न केला त्याचे नांव अविनाश सुभाष सावंत, ( वय-२६, रा. उपळी, ता. वडवणी जि. बीड ) असे समजून आले.
दरम्यान, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अविनाश सावंत याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. तथापि, तो हाती लागत नव्हता. या अनुषंगाने पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीची माहिती काढून आरोपी हा चाकण पुणे येथे असल्याचे समजल्याने लागलीच तेथे तपास पथक पाठवून चाकण येथून सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.
आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने अनेकांची फसवणूक केल्याचेही चौकशीतून आढळून आले. यातील एक्सेंट कंपनीची दीड लाख रूपये मूल्य असणारी गाडी, दोन मोबाईल आदी बाबी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या चौकशीतून अन्य गुन्हे देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी. भरत काकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, पोहेकॉ/२६५० युवराज नाईक, पोना/२८६५ शांताराम सिताराम पवार, पोना/२८४१ भूपेश वंजारी, मपोना/२९३७ अनिता सुरवाडे, मालती बच्छाव यांचे पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे स्वतः करीत आहेत.
सर्व नागरिकांना चाळीसगांव ग्रामीण पोलीसांकडून आवाहन करण्यात येते की, अशाप्रकारे सोलर पंप देण्याच्या आमिषातून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी त्यांच्या हद्दीतील पोलीसांशी संपर्क साधावा त्याचप्रमाणे नागरिकांनी व शेतकर्यांनी कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन येणार्या सबसिडीच्या व इतर प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये.