लक्ष्मी नगरात शार्टसर्कीटमुळे घरात किरकोळ आग

जळगाव प्रतिनिधी । शहरातील लक्ष्मीनगर येथे रिकामे असलेल्या घरात शॉर्टसर्किट होवून आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीत दरवाजासह संपूर्ण घरातील वायरिंग व इतर किरकोळ वस्तू खाक होवून नुकसान झाले आहे.

मिळालेली माहिती अशी की, कासमवाडी परिसरातील लक्ष्मीनगरात राजू पंडीत सोनवणे हे पत्नी व मुलासह वास्तव्यास आहेत.  ते जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. लक्ष्मीनगर येथे एक दुमजली इमारतीत रिकामे घर आहे. या घरात कुणीही राहत नसून जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक घरातील खोलीत वायरिंगमुळे शार्टसर्किट झाले. आग लागून धुर निघाल्यामुळे इमारतीत राहणार्‍या नागरिकांच्या प्रकार लक्षात आला. याच परिसरात राहणार्‍या राजू सोनवणे यांनाही घटना समजली. त्यांनी तत्काळ नागरिकांच्या मदतीने पाण्याचा मारा करुन आग विझविली. या आगीत घरातील संपूर्ण वायरिंग खाक झाली असून बाथरुमचा दरवाजा जळाला आहे. दरम्यान ही घटना वार्‍यासारखी या परिसरात पसरली.  

Protected Content