जळगावात भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास हॉटेल राधिका समोर खोटे नगर येथे घडली. जखमी दुचाकीस्वारास जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शी यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील खोटे नगर जवळील हॉटेल राधिका समोर दुचाकी क्रमांक (एमएच १९ टीसी ७५०७) वरील दुचाकीस्वाराला स्कार्पियो कार क्रमांक (एमएच १९ सीएफ ८२८२) ने जोरदार धडक दिली. या धडकते दुचाकीस्वार (नाव गाव पुर्ण माहित नाही) जखमी झाला असून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान स्कॉर्पींओ कार चालकाने जखमी तरूणास जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे. हा आपघात खराब रस्ता आणि रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे झाला असा आरोप येथील नागरीकांना केला आहे. तालुका पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेवून घटनेची माहिती घेतली.

(सविस्तर बातमी लवकरच)

Protected Content