Home क्राईम चाळीसगावातून प्रौढ भाजी विक्रेता बेपत्ता : ‘बाहेर जाऊन येतो’ म्हणत निघाले, घरी...

चाळीसगावातून प्रौढ भाजी विक्रेता बेपत्ता : ‘बाहेर जाऊन येतो’ म्हणत निघाले, घरी परतलेच नाहीत !

0
4

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गजानन वाडी, शास्त्रीनगर परिसरातून ५३ वर्षीय भाजीविक्रेता अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात १२ ऑगस्ट रोजी मिसिंगची खबर दिली असून, पोलिसांकडून बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

अशोक बाबुलाल चौधरी (वय ५३) असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पत्नी सुनिता, मुलगी राधिका आणि मुलगा दिनेश यांच्यासह गजाननवाडी, शास्त्रीनगर येथे राहत असून चाळीसगाव शहरातील अभिनव शाळेजवळ सकाळी व सायंकाळी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.

पत्नी सुनिता चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.१० वाजता अशोक चौधरी हे “बाहेर जाऊन येतो” असे सांगून घरातून निघून गेले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता फोन बंद येत होता.

यानंतर कुटुंबीय व नातेवाईकांनी चाळीसगाव शहरातील बसस्थानक, दर्गा परिसर, रेल्वे स्टेशन तसेच इतर संभाव्य ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखेर पत्नी सुनिता चौधरी यांनी पुतणे मुकेश नंदुलाल चौधरी यांच्यासह चाळीसगाव शहर पोलीस ठाणे गाठून मिसिंगची खबर दिली.

बेपत्ता व्यक्तीचे वर्णन

अशोक चौधरी यांची उंची सुमारे ५ फूट ५ इंच, रंग सावळा, शरीरयष्टी पातळ असून केस पांढरे आहेत. त्यांनी नारंगी व गुलाबी रंगाच्या लाईनिंगचा शर्ट आणि निळ्या रंगाची पँट परिधान केली होती. त्यांना मराठी तसेच अहिराणी भाषा बोलता येते. त्यांच्याकडे मोबाईल फोन असून त्याचा क्रमांक 7768083774 असा आहे.

अशोक चौधरी यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound