चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील विविध प्रभाग, चौक व मुख्य ठिकाणांची दर रविवारी साफसफाई करण्याचा आगळावेगळा संकल्प आमदार मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे करण्यात आला आहे. या निमित्ताने १ जानेवारी २०२० रोजी प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव बसस्थानकापासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण व सौ प्रतिभा मंगेश चव्हाण हे दाम्पत्य, सोबत नगराध्यक्षा आशालता चव्हाण, जेष्ठ नगरसेवक राजू चौधरी, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक सोमसिंग राजपूत, नगरसेवक आनंद खरात, चिराग उद्दीन शेख, नगरसेविका विजयाताई पवार, विजयाताई पवार, जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, भाजपा सरचिटणीस सुनील निकम, भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, एम.बी. पाटील, विस्तार अधिकारी शिर्के साहेब, दीपक राजपूत, शांताराम पाटील, कैलास पाटील, किशोर रणधीर, अजय अहिरे, तुषार पाटील, गणेश पाटील, सोनल वाघ, कावेरी पाटील, योजना पाटील, जयश्री रणदिवे आदी उपस्थित होते.