मुक्ताईनगर बस डेपोच्या जागेतील प्रस्तावित व्यापारी संकुलाला हिरवा कंदील !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आ.चंद्रकांत पाटलांनी २०१९ मध्ये विधानसभा लढवितांना गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे आश्वासन देत, मतदार संघातील गल्ली बोळातील रस्ते, गटारी,शेत रस्ते, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी योजना, मुक्ताईनगर व बोदवड शहराच्या पाणी योजना, व्यापारी संकुल विविध समाजासाठी तालुका ठिकाणी हक्काचे सामाजिक सभागृहे आदींसह एमआयडीसी, सुलवाडी ते मेंढोदे पुल, मुक्ताईनगर येथील एस टी डेपोच्या जागेतील व्यापारी संकुल, सिंचन योजना यापैकी रस्ते ,गटारी व सामाजिक सभागृहे आदी मागण्यांचे प्रत्येक गाव व शहरातील नागरिकांच्या घरापर्यंत विकास पोचविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

एमआयडीसी देखील मंजूर झालेली असून मुक्ताईनगर शहरातील ४ थ्या टप्प्याचे पुनर्वसन जे पूर्वीची लोकप्रतिनिधी म्हणायचे हे पुनवर्सन होऊच शकत नाही ते अशक्य प्राय असे ४१३ घरांचे पुनर्वसन तसेच रावेर तालुक्यातील वाघाडी, भामलवाडी तसेच ऐनपुरचे पुनर्वसन देखील आमदारांनी मंजूर करून दाखवले आहे. दमदार विकासाची गंगाच येथे वाहताना दिसून येत आहे. तसेच दि. ४ मार्च २०२४ रोजी मुख्यमंत्र्यांचा पुन्हा दुसरा दौरा मुक्ताईगरीत होत असून दोन तालुके व बाजार पेठांना जोडणारा सुलवाडी ते मेंढोदे पुल आणि मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकातील व्यापारी संकुल तसेच विविध समाजांच्या सामाजिक सभागृहांचे भूमिपूजन होणार आहे. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे,आगार प्रमूख बाविस्कर, उप तालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख प्रशांत टोंगे, विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे, शहर संघटक वसंत भलभले, नगरसेवक संतोष मराठे, योगेश पाटील,निलेश मेढे, शुभम शर्मा आदींची उपस्थिती होती.

 

Protected Content