धरणगाव येथे ‘फुले दाम्पत्य सन्मान दिन’ उत्साहात साजरा

dharangaon damptya din

धरणगाव, प्रतिनिधी | येथील महात्मा फुले विद्यालयात आज (दि.१) ‘फुले दाम्पत्य सन्मान’ दिनानिमित्त क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेच्या जेष्ठ शिक्षीका सौ.एम.के. कापडणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसुर्य- राष्ट्रपिता-महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता-सावित्री माई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

शाळेतील उपशिक्षक पी.डी. पाटील यांनी महात्मा फुले यांचे विचार व त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य याबद्दल अनेक उदाहरणे देऊन विस्तृतपणे माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.कापडणे यांनी महात्मा फुले व सावित्री माई फुले या दाम्पत्याचा आदर्श घेवून त्यांच्या विचारांवर चालण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख व्ही.टी. माळी यांनी केले. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.व्ही.आढावे केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Protected Content