धरणगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन

chaudhari and tausif

धरणगाव, प्रतिनिधी | शहराचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सलिम पटेल यांचे नुकतेच अकाली निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेवून वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा त्या जागी त्यांच्याच वारसास नियुक्त करून ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, अशी इच्छा प्रभारी नगराध्यक्ष प्रविण (वासुदेव) रघुनाथचौधरी यांनी व्यक्त केली आहे.

 

त्यांनी पुढे म्हटले आहे की, तमाम धरणगावकर जनता व राजकीय पक्षांना मी विनंती करतो की, स्व. सलिम पटेल यांच्या अकाली निधनानंतर शहरात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीचे स्वप्न अनेकांना पडू लागलेले आहे. मात्र या पोट निवडणुकीमुळे मोठया प्रमाणात सर्वसाधरण जनतेचा पैसा नगर पालिकेमार्फत खर्च होणार असून निवडणुकीत दोन महिनेही वाया जाणार आहेत. तसेच त्यामुळे शहराच्या विकासात पुन्हा अडथळा निर्माण होणार आहे. हे सर्व आपण सहजगत्या टाळु शकतो जर सलिमभाऊ यांना दिलेले पाच वर्षांचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे त्यांच्या निधनानंतर त्यांच्याच वारसास म्हणजे त्यांच्या पत्नी किंवा मुलगा तौसिफ यांना देवून बिनविरोध नगराध्यक्ष पदावर विराजमान केले तर त्यामळे जनतेचा पैसा वाचणार आहे. तसेच सलिम
भाऊ यांना ती खरी श्रध्दांजली ठरेल. तसेच हा एक आदर्श निर्माण होवून निवडणुकीमुळे निर्माण होणारी आपआपसातील कटूता व मतभेदही टाळणे शक्य होईल. त्या अनुषंगाने शहराचा विकास करणेही शक्य होईल.

Protected Content