चार मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप

Uddhav Bhujbal

 

मुंबई (वृत्तसंस्था) नव्या मंत्रिमंडळाच्या सत्ता स्थापनेनंतर आज चार मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप सुरु झाले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांचा समावेश आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगला मिळाला आहे. तर छगन भुजबळ यांना रामटेक, जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले मिळाले आहेत. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेत्याचा बंगला मिळाला आहे.

Protected Content