देशातील घोटाळ्यांची संख्या वाढली- काँग्रेसची टीका

congress logo

मुंबई । देशातील घोटाळ्यांची संख्या वाढत असल्याचे आरोप करत काँग्रेसने भाजपवर आज जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमध्ये आर्थिक बेशिस्त वाढलेली आहे. त्याचबरोबर या सरकारला आर्थिक घोटाळे रोखण्यातही अपयश आलेले दिसते. ठोस कारवाईच्या अभावी वित्तीय संस्थांमधील घोटाळ्यांना पायबंद घालण्यात सरकार कुचकामी ठरले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या संदर्भात सोशल मीडियात पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. २०१६ ते २०१७ मध्ये २३ हजार ९७४ कोटींचे घोटाळे झाले आहेत. २०१७- १८ च्या काळात ४१ हजार १६७ कोटींचा एकूण घोटाळा झाला होता. त्याचप्रमाणे २०१८- १९ मध्ये ७१ हजार ५४३ तर २०१९-२० काळात १ लाख १३ हजार ३७४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

Protected Content