बहाळ येथे एकाला मारहाण

चाळीसगाव प्रतिनिधी| किरकोळ भांडणा वरून एका मजूराला काठीने डोक्यात मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील बहाळ येथे घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील बहाळ येथील राजेश लुबान कोळी (वय-३६) व भुरिया रामदास भोई दोघेही रा. बहाळ् ता. चाळीसगाव यांच्यात शनिवार,१७ जुलै रोजी सकाळी किरकोळ कारणावरून भांडण झाली. मात्र राजेश लुबान कोळी हे सायंकाळी आपल्या राहत्या घरात जेवण करीत असताना भुरिया रामदास भोई यांनी हातातील काठीने डोक्यात जबर मारहाण केली. त्यावर राजेश लुबान कोळी यांनी मेहूणबारे पोलिस स्थानक गाठून भादंवि कलम- ३२४, ४४८ प्रमाणे भुरिया भोई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास योगेश मांडूळे हे करीत आहेत.

Protected Content