चाळीसगाव चव्हाण महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

chalisgaon abhiwadan

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालया डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष बी.व्ही.चव्हाण, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रमुख वक्ते डॉ.आर.पी. निकम म्हणून उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव विनोद कोतकर, डॉ.एम बी पाटील, क. मा. राजपूत, प्राचार्य डॉ.एम.व्ही. बिल्दिकर, कार्यक्रमाचे समन्वय प्रा. शशिकांत भामरे उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्राचार्य बिल्दिकर सरांनी या थोर महामानवाच्या विचार प्रत्येकानी आचरणात आणले पाहिजे. प्रमुख वक्ते डॉ निकम सरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व पुणे करार या विषयी माहिती दिली. तर अध्यक्षिय मनोगतात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. भामरे, प्रा. लोंढे, प्रा. उनदिरवाडे, प्रा. सदावर्ते, प्रा. धांदे, प्रा. बोरसे, प्रा. नितीन नंन्नवरे, प्रा. खापर्डे मँडम, प्रा. जगताप मँडम, प्रा. रमण घेटे सर,प्रा. वाघमारे, सेवक देविदास मोरे, मधु जाधव यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बिल्दिकर, सुत्रसंचालन डॉ गंगापुरकर तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य काटे यांनी मानले.

Add Comment

Protected Content