चाळीसगावकर घेताहेत पोहण्यासह योगासनाचा आनंद ! (व्हिडीओ)

chalisgaon news 2

चाळीसगाव प्रतिनिधी । पोहण्याच्या व्यायामाबरोबरच पाण्यातील योगा शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त चाळीसगाव नगरपालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलावात नियमित पोहण्याचा व्यायाम करणारे जलतरण व्यायाम प्रेमी सदस्य रोज सकाळी पोहण्याच्या व्यायामाबरोबरच पाण्यात विविध प्रकारचे योगासने करून जगातील सर्वोत्तम व्यायामाचा आनंद घेत आहे.

पाण्यातच करतात विविध प्रकारचे आसने
सध्या थंडीचे दिवस असताना देखील हे व्यायाम प्रेमी न चुकता हा व्यायाम करत असल्याने शरीर निरोगी व चपळ ठेवण्यासाठी उपयोग या जलतरण व्यायामाचा नक्कीच होतो पाण्यामध्ये शवासन, पद्मासन, शीर्षासन असे योगासने केली जात आहेत. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी इतर नागरिकांनीही या जलतरण  व्यायामात सहभाग घ्यावा व जगण्याचा मनमुराद आनंद लुटावा, अशी अपेक्षा चाळीसगाव स्विमिंग क्लब असोशियन सदस्यांनी केली आहे. यात असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य रमेश सपकाळे, माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे, उपाध्यक्ष राजेंद्र मांडे, गिरीश भामरे, बाळासाहेब सोनवणे, निळकंठ सुर्यवंशी, बलदेव पुन्शी, व्यवस्थापक महेंद्र चौधरी, रावसाहेब पाटील, पहीलवाल पवन बंग, समकित छाजेड, यांचा समावेश आहे.

Protected Content