सोमवारपासून चोपडा तहसिल कार्यालय येथे आशा गटप्रवर्तक फेडरेशनतर्फे चक्री उपोषण

 

चोपडा, प्रतिनिधी | आशा गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढबाबत शासकीय आदेश(जी.आर.) निघणे अत्यावश्यक झाले कारणाने या बाबतीत आशा गटप्रवर्तक संघटना कृती समितीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. यानुसार सोमवार २ सप्टेंबर पासुन तहसिल कार्यालय येथे चक्री उपोषण करण्यात येणार आहे.

आशांना तेलंगणा राज्याप्रमाणे किमान १० हजार रुपये मानधन द्या, मानधनवाढीचा रखडवलेला जीआर काढावा यासाठी हे चक्री उपोषण करण्यात येणार आहे. तसेच दिनांक ३ रोजी आरोग्य मंत्र्यांनी जर शासकीय आदेश (जी.आर)काढण्याचे लेखी पत्र दिले नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. यानूसार चोपडा येथेही २ सप्टेंबर रोजी तहसिलदार कार्यावर सकाळी ११वाजेपासून १ दिवशीय उपोषण करण्याचा निर्णय चोपडा तालुका आशा गटप्रवर्तक संघटनेने घेतला आहे.तरी आशा व गटप्रवर्तक यांनी लढाई अंतिम टप्प्यात आली असून त्यां आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी कॉ. अमृतराव महाजन, शैला परदेशी, मीनाक्षी सोनवणे, संगिता पाटील, मनिषा पाटील, संजना विसावे, कल्पना महाले आदींनी केले आहे.

Protected Content