महिलांनी आत्मसन्मानासाठी जागृत राहिले पाहिजे : ॲड. अनुराधा वाणी (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । महिलांनी आत्मसन्मानासाठी जागृत राहिले पाहिजे. सावित्रीबाई फुले यांचे कार्य शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अमूल्य असून त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून प्रत्येक महिलांनी त्यांच्या क्षेत्रात भरारी घेवून यश मिळविले पाहिजे, असे प्रतिपादन ॲड. अनुराधा वाणी यांनी केले.

येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे उपक्रमशील शिक्षक विजय सुपडू लुल्हे यांनी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच महिला शिक्षण दिनानिमित्त सत्कार आयोजित केला होता.

मंचावर अध्यक्षस्थानी ॲड. अनुराधा वाणी, जळगाव जनता बँकेच्या संचालिका आरती हुजुरबाजार, सावित्री सोळुंके, युवराज माळी, प्रकाश शिरसाठ, पर्यावरण प्रेमी नाना पाटील उपस्थित होते. प्रस्तावना विजय लुल्हे यांनी केली. यानंतरस सन्मानार्थी सर्व महिलांचा व त्यांच्या कार्याचा परिचय विश्वजीत चौधरी यांनी करून दिला.

ॲड. अनुराधा वाणी म्हणाल्या की, महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव हे खूप मोठे महत्त्वाचे कार्य आहे. महिलांना आजही दुय्यम वागणूक तिला सामोरे जावे लागते असे सांगून त्यांनी “मी सावित्री बोलतेय” एकपात्री नाटिका सादर केली. यावेळी वाढदिवसानिमित्त आदर्श माता सिंधू सुपडू सुतार यांना मान्यवरांनी गौरविले.

१८ महिलांचा  गौरव 
यामध्ये अरुणा उदावंत, प्रणाली सिसोदिया, धनश्री बागुल, नाजनीन शेख, यशोदा कणसे, मंगला बारी, सरिता नेरकर, अधिसेविका कविता नेतकर, दिव्यांग मीनाक्षी निकम, छाया पाटील, हर्षाली पाटील, स्वाती भावसार, वर्षा अहिरराव, सुष्मिता भालेराव, मनीषा मेथाळकर, वैशाली विसपुते, प्रभावती बावस्कर, संगीता माळी यांना शाल, स्मृतिचिन्ह, पुस्तके देऊन गौरविण्यात आले. सन्मानार्थीतर्फे अरुणा उदावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन छाया पवारपाटील यांनी तर आभार विश्वजीत चौधरी यांनी मानले.

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे, आर. एस. चौधरी, मराठी विज्ञान परिषदेचे सचिव प्रा.दिलीप भारंबे, प्रा. आर. ए. पाटील, पर्यावरण प्रेमी सुरेंद्र पाटील, जेष्ठ पत्रकार दीपक महाले, वर्धिष्णू संस्थेचे अद्वैत दंडवते, जनमत प्रतिष्ठानचे पंकज नाले, जिंदगी फाउंडेशनचे अजय पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी निर्मिती लुल्हे, सुवर्णा लुल्हे, समीक्षा लुल्हे, सुपडू सुतार, मीनाक्षी चौधरी, राहुल सोळुंके, सुनील दाभाडे आदींनी परिश्रम घेतले.

समीक्षा विजय लुल्हे हीचे आदर्श सामाजिक उत्तरदायित्व
सन २०२० मध्ये इयत्ता दहावी परीक्षेत ९९.८० % गुण प्राप्त करून खानदेश मधून पहिली आलेली समीक्षा विजय लुल्हे हीने कचरा वेचक व बालमजूर तसेच आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना सुरक्षित व आनंददायी बालपण देणाऱ्या आनंदघरसाठी मिळालेल्या बक्षिसाची एकूण रक्कम २१०० रुपयांची देणगी रोखीने प्रणाली सिसोदिया (वर्धिष्णू सोशल रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट सोसायटी) यांना सुपूर्द केली. समिक्षेच्या संवेदनशील सामाजिक दायित्वाचे अद्वैत दंडवते यांनी कौतुक केले. तसेच प्रकाश शिरसाठ (पहूर) यांनीही आनंद घरसाठी देणगी दिली .याप्रसंगी समीक्षाची ज्येष्ठ भगिनी सुवर्णा लुल्हे, आजोबा सुपडू सुतार (निवृत्त मुख्याध्यापक), वडील प्राथमिक शिक्षक विजय लुल्हे उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/736997926942520

 

Protected Content