जळगाव प्रतिनिधी । चोपडा येथील गुन्ह्यातील आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर करण्यासाठी आलेल्या होमगार्डला आज सायंकाळी अचानक चक्कर येवून खाली पडले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत माहिती अशी की, चोपडा येथील गुन्ह्यात असलेल्या आरोपींची आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. त्याकरीता चोपडा ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांसोबत आलेले होमगार्ड कर्मचारी श्रावण तेली यांना सायंकाळी न्यायालयाजवळी चौकात अचानक चक्कर येवून खाली पडले. त्यांना पत्रकार वसीम खान यांच्यासह सहकाऱ्यांनी तातडीन शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.