जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रथ चौक परिसरामध्ये एका २९ वर्षीय महिलेला जवळ बोलून अश्लील चाळे करत विनयभंग करून धमकी दिल्याची घटना २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. या संदर्भात चौकशी केल्यानंतर गुरुवारी ३० जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २९ वर्षीय महिलाही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता महिला ह्या रथ चौक परिसरातून जात असताना तिच्याच परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने दुचाकीजवळ बोलाविले. त्यानंतर तिच्यासोबत असतील अश्लील चाळे करून महिलेचा विनयभंग केला आणि धमकी दिली. दरम्यान या घटनेबाबत पीडित महिलेने शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार चौकशी केल्यानंतर अखेर गुरुवारी ३० जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजता वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात ४५ वर्षे व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर या करीत आहेत.