पहूरच्या ग्रामीण रूग्णालयात मध्यवर्ती ऑक्सीजन प्रणालीचे उदघाटन

शेअर करा !

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांच्या सेन्ट्रल ऑक्सीजन पाईपलाईन प्रणालीचे उदघाटन माजी जलसंपदामंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आज करण्यात आले.

store advt

जामनेर तालुक्यातील पाळधी , वाकोद , पहूर , शेंदुर्णीसह ग्रामीण भागात कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी वाढत असल्याने शासन – प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात ३० बेड साठी सेन्ट्रल ऑक्सिजन पाईपलाइन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असणार्‍या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी या प्रणालीचे उदघाटन केले. यावेळी तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदिप लोढा, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, आरोग्यदूत अरविंद देशमुख ,सरपंच पती रामेश्‍वर पाटील, सरपंच पती शंकर घोंगडे, नोडल ऑफिसर तथा पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा, डॉ. पुष्कराज नारखेडे, डॉ. संदीप कुमावत, डॉ. सचिन वाघ, डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ . कुणाल बाविस्कर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,परीचारक, परिचारिका यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी, पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!