जळगाव प्रतिनिधी । आज (दि.२० नोव्हेंबर) शुक्रवार रोजी केंद्रिय मानवधिकार संघटना नवी दिल्लीची जळगाव तालुका कार्यकारणी राष्ट्रीय संघटन सचिव शिवचरण उजैनकर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील बी.जे. मार्केटमधील कल्याणी प्लायवूड येथे सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी जळगाव तालुका कार्यकारणी उजैनकर सर यांनी घोषित केली.
ती पुढीलप्रमाणे :- अध्यक्षपदी किशोर पाटील, महिला उपाध्यक्षपदी ज्योती राणे, पुरूष उपाध्यक्षपदी प्रदीप नारखेडे, कार्याध्यक्षपदी अजय पाटील, सचिवपदी महेंद्र फेगडे, सहसचिव रविंद्र राव आणि कोषाध्यक्षपदी एकनाथ सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.