पाचोरा (प्रतिनिधी) येथील अल्पबचत भवनात नुकताच ग्रंथ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार स्मिताताई वाघ यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत शासन मान्यता प्राप्त ग्रंथालय व वाचनालयांना ग्रंथ वाटप करण्यात आले.
या ग्रंथ वितरण सोहळ्याला पाचोरा, भड्गाव, तालुक्यातील ग्रंथालयाचे अध्यक्ष, प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार स्मिताताई वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी सुहासजी रोकडे,विधानसभाक्षेत्र प्रमुख मधु काटे, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, शहराध्यक्ष नंदू सोमवंशी,कृउबा सभापती सतीश शिंदे, भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील हे पाहुणे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राज्य परिषद सदस्य डी .एम .पाटील, सरचिटणीस प्रदीप पाटील, नगरसेवक अमोल शिंदे, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, विस्तारक दीपक देशमुख, शहर सरचिटणीस नितीन पाटील, शहर उपाध्यक्ष वीरेंद्र चौधरी, संजय पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश पाटील, यु .मो .शहराध्यक्ष राजेंद्र कूमावत, अजय सोनार, देवराम लोणारी, सुधीर पुणेकर, जगन्नाथ सोनवणे, मनोज देवरे, भडगाव शहराध्यक्ष शैलेश पाटील, भ.ता.सरचिटणीस अनिल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी सौर ऊर्जेवर पीएचडी केलेले प्रा . दीपक मराठे यांचा सत्कार उदय वाघ यांनी केला. तसेच स्मिताताई वाघ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर सर्व ग्रंथालय व वाचनालय प्रतिनिधीना अध्यक्षा व प्रमूख पाहुण्यांनी ग्रंथांचे वाटप केले. यावेळी सूत्र संचलन शहराध्यक्ष नंदू सोमवंशी यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.