अमळनेर इंटरनॅशनल स्कूल येथे महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथिल ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.

शाळेचे प्राचार्य विकास चौधरी, एम ए पठाण, निलेश वानखेडे, वसीम शहा, क्रीडाशिक्षक देशमुख तसेच शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणी सर यांनी केले. यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. त्याचप्रमाणे प्राचार्य विकास चौधरी सर यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व ठामपणे पटवून दिले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Protected Content