चाळीसगाव येथे वृक्ष वाटप करून वाढदिवस साजरा

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील संभाजी सेनेचे संस्थापक लक्ष्मण शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील पवारवाडी व संभाजीनगर भागात वृक्ष वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

सविस्तर माहिती अशी की, संभाजी सेनेचे संस्थापक लक्ष्मण शिरसाठ यांचा १ जून रोजी ५४वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून शहरातील पवारवाडी व संभाजीनगर भागात आवळा, कडूलिंब, चिंच बादाम, आपटा, शोभेची व गर्द छायेची रोपटे वाटप करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल बिघडू न देण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असल्याची प्रतिक्रिया संभाजी सेनेचे संस्थापक लक्ष्मण शिरसाठ यांनी यावेळी सांगितले. ॲड.आशा शिरसाठ व त्यांच्या सहकार्यांनी परिसरात रोपट्यांची वाटप केली. याप्रंसगी संभाजी सेनेचे शहर अध्यक्ष अविनाश काकडे, सनी पाटील, कृष्णा, मिनाक्षी नारखेडे, स्वाती नारखेडे, विकी पाटील, पार्थ पाटील, राजेंद्र आगोणे आदींनी यावेळी सहभाग नोंदवला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.