Home Cities जळगाव जिल्हयात विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर सुरु

जिल्हयात विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर सुरु

0
169


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत ‘समता पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम १ एप्रिल २०२५ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

या पंधरवड्याच्या निमित्ताने, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेचे स्वरूप
विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रे तालुका व महाविद्यालय निहाय सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्यामार्फत पडताळली जाणार आहेत. पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरून मूळ कागदपत्रांसह महाविद्यालयातील समन्वय अधिकाऱ्यांकडे सादर करता येईल. समिती स्तरावरून अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून जात प्रमाणपत्र प्रदान करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, जिल्हा जात पडताळणी कार्यालयामार्फत ३ एप्रिल ते ४ एप्रिल आणि १० एप्रिल ते ११ एप्रिल २०२५ या कालावधीत त्रुटी पूर्तता शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव एन. एस. रायते यांनी केले आहे.


Protected Content

Play sound