बसस्थानक आवारातून महिलेच्या पर्समधून रोकडची चोरी

चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील बसस्थानक महिलेच्या पर्समधून ४० हजारांची रोकड आणि महत्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची घटना १० जून रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ११ जून रोजी दुपारी १२ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंदना गोरख राठोड वय ३८ रा. पाटणा ता. चाळीसगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवारी १० जून रोजी महिला चाळीसगाव शहरात आलेल्या होत्या. दुपारी ४ वाजता पाटणा येथे जाण्यासाठी चाळीसगाव बसस्थानकात आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले ४० हजारांची रोकड आणि महत्वाची कागदपत्रे असा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान पर्समधून रोकड ची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने शोधाशोध केली, परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी मंगळवारी ११ जून रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठज्ञण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्ररीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करीत आहे.

Protected Content