जामनेर प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे आ.राजू नवघरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर चढवून शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशा मागणीचे लेखी निवेदन भाजप जामनेर तालुक्याच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष अतिश झाल्टे जे के चव्हाण नगर पालिका गटनेते डॉक्टर प्रशांत बोर्डे डॉक्टर संजीव पाटील नगरसेवक बाबुराव हिवराळे उल्हास पाटील निलेश चव्हाण दिपक तायडे तेजस पाटील रवींद्र बर्डे राहुल पाटील विकास वंजारी मयुर पाटील आकाश नेमाडे विजय शिरसाट कैलास पालवे प्रफुल्ल महाजन आधी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
वसमत मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यावर चढवून शिवाजी महाराजां ना पुष्पहार घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे पाय महाराजांना लागले यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला असून हे अशोभनीय प्रकार आहे. या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने या घटनेचा निषेध करून आमदार राजू नवघरे यांनी आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.