रावेरातून माजी आ. अरूण पाटील जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात

रावेर प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत रावेर माजी आमदार अरुण पाटील यांनी  आपला उमेदवारी अर्ज विकास सोसायटी मतदारसंघातुन आज दाखल केला. सर्व पक्षीय पॅनल मध्ये माजी आमदार अरूण पाटील राष्ट्रवादीच्या गोठ्यातुन इच्छुक आहे. यावेळी त्यांच्या सोबत आमदार अनिल भाईदास पाटील सतालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा बँकेची रणधुमाळीला सुरुवात झाली. काँग्रेसने जरी वेगळी चुल मांडली असली तरी अद्याप भाजपा राष्ट्रवादी व शिवसेनेने कोणत्या तालुक्यात कोणाला उमेदवारी द्यायची हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आज जळगाव जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात विकासो सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार अरुण पाटील यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी श्री गवई यांच्याकडे भरण्यात आला.

यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे, इंदिराताई पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, माजी जि.प. सदस्य आत्माराम महाराज कोळी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!