वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, आधार संस्था अमळनेर, तसेच विहान काळजी व आधार केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वासल्य मिशन योजनेसाठी जळगाव येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हे शिबिर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरील विहान काळजी व आधार केंद्राच्या कार्यालयात पार पडले. यामध्ये गरजू 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी आर्थिक मदतीसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. शिबिरात एकूण 43 लाभार्थ्यांची कागदपत्रे जमा करण्यात आली.
यावेळी जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे जिल्हाप्रमुख संजय पहूरकर, विहानच्या प्रकल्प संचालिका सुनिता तायडे, तसेच विहानचे कार्यकर्ते उपस्थित होते. गरजू मुलांच्या पालकांनी मोठ्या संख्येने शिबिराला प्रतिसाद दिला. महाराष्ट्र शासनाच्या वासल्य मिशन योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मदत दिली जाते. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळणार आहे.