जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ठेकेदारांना कामे देण्यासाठी जळगाव महापालिकेचे शहर अभियंता अमृतकर यांनी तब्बल ५० लाख रूपयांची मागणी केल्याचा सनसनाटी आरोप आज शिवसेना-उबाठा पक्षाचे नेते रमेश माणिक पाटील यांनी केला आहे.
आज जळगाव महापालिकेवर जळगाव शहरातील आशाबाबा नगर, माऊली नगर, अथर्व कॉलनी, आरएमएस कॉलनी व गणेश पार्क या भागातील नागरिकांनी रस्त्यांच्या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा काढला. त्यांनी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना घेराव घालत जाब विचारला. याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते रमेश माणिक पाटील यांनी या नागरिकांच्या आंदोलनास पाठींबा देतांना महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना रमेश माणिक पाटील म्हणाले की, नागरिकांनी या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना याठिकाणी घेराव घालण्यात आलेला असून महानगरपालिकेला खरं म्हटलं तर ताला ठोकला पाहिजे कारण या महानगरपालिकेमध्ये शासन आणि प्रशासन या सर्वांनी लाज, लज्जा व शरम सोडलेली आहे. एका बाजूला गरीब लोकं रस्त्यासाठी भांडताय दुसऱ्या बाजूला इथे असे मुजोर अधिकारी बसविण्यात आले आहेत. एका ठेकेदाराने 20 कामांसाठी तीस ते चाळीस लाख रूपयांची गुंतवणूक केली. मात्र शहर अभियंता अमृतकर यांनी कामांसाठी तब्बल 50 लाख रूपयांची मागणी केली असून ते दिले नसल्याने कामे अडवून ठेवल्याचा आरोप केला.
जळगाव जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री आहेत एक एक केंद्रीय मंत्री असले तरी महापालिकेवर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. याबत आम्ही कलेक्टरकडे लोकशाही दिनी आम्ही अर्ज केला तरी सुद्धा ताई न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर जळगावातील जनतेच्या पाठीशी आपण आपण आपला पक्ष खंबीरपणे उभा राहणार असल्याचे रमेश माणिक पाटील यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.
खालील व्हिडीओत पहा रमेश माणिक पाटील यांचा सनसनाटी आरोप !