जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जळगाव क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध कला गुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन ३० डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती प्रताप नगर येथे जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत यांनी सोमवारी २६ डिसेंबर रोजी सायंकाळी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

सदर युवा महोत्सवामध्ये वय वर्ष १५ ते २९ वर्षाआतील वयोगटातील खालील कला प्रकारात युवक-युवती सहभाग घेवु शकणार आहे. ईच्छुक युवक व युवतींनी आपली प्रवेशिका २८ डिसेंबर रोजीपर्यंत जळगाव येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करायची आहे. प्रवेशाच्या वेळी सोबत जन्म तारखेबाबतचा पुराव रहिवासी असल्याबाबतचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे. सोबत आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, बोर्ड प्रमाणपत्र, व्हॉटसॲप नंबर, मेल आयडी, सोबत प्रवेश अर्ज हे सादर करावयाची आहे. ओळखपत्राचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. ऐनवेळी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही तसेच वेळेत बदलही करता येणार नाही. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम व बंधनकारक राहिल. त्याबाबत कोणताही तोडी अथवा लेखी आक्षेप घेता येणार नाही.

सदर युवा महोत्सवात सहभागी होणा-या कलाकार युवक व युवती यांनी अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित जळगांव यांनी प्रसिध्दी दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

 

Protected Content