आपत्ती काळात गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । आपत्ती काळात शासकीय वैद्यकिय अधिकारी गैरहजर राहत असल्याची तक्रार येत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केली.

पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, जून महिन्यात खरीप हंगामाला सुरूवात होणार आहे. शेतकऱ्यांना २५ तारखेपासून जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला बियाणे उपलब्ध होणार आहे. केळी विकास महामंडळाचे जळगाव मुख्यालय होण्यासाठी आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत साकारात्मक भूमीका घेतली आहे. कोरोनासंदर्भात शासनाकडून मदतीची आस न धरता इतर विविध संस्थांनी पुढे येवून मदत करण्याचे आवाहन केले. कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने नागरिकांनी तातडीने जिल्हा कोवीड रूग्णालयात उपचारार्थ दाखल व्हावे, जेणेकरून तातडीने व वेळेत उपचार करण्यास मदत होईल. उद्या लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन पालकमंत्री ना. पाटील यांनी केली आहे. दरम्यान, आपत्ती काळात शासकीय वैद्यकिय अधिकारी गैरहजर राहत असल्याची तक्रार येत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात येणार आहे.

रेड झोनचे तालुका वगळता इतर भागात दैनंदिन व्यवहार सोशल डिस्टन्सिंगनुसार सुरू करण्याची परवानगी दिलीत. नवीन स्टॉक न देता आहे त्या स्टॉकमध्ये दारूची ऑनलाईन घरपोच सेवा देण्यात येणार आहे. जिल्ह्यात ३५१ पॉझिटीव्ह आढळून आला आहे. तर आत्तापर्यंत ११० जणांना कोरोनामुक्त करून घरी पाठविण्यात आले आहे. तर ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. १६० ऑक्सीजन बेड आहे. तर नव्याने १० आयसीयु बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. भुसावळतील ट्रामासेंटरच्या इमारतीचे काम पुर्ण झाले असून येत्या दोन दिवसात ते कार्यान्वित होणार आहे.

कोरोना तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित होणार – जिल्हाधिकारी
मंजूर केलेल्या उद्यापासून संशयित कोरोनास्वॅब तपासणीचे १३५ क्षमतेची प्रयोगशाळा सुरू होत आहे. त्यामुळे दोन दिवस तपासणी अहवालाची वाट पहावी लागणार नाही. भुसावळचे रेल्वे हॉस्पीटल विलीनीकरण केले असून लवकरच आपण कोरोनावर मात करू असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी केले असून कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. लॉकडाऊन नंतर शिथीलता केले म्हणजे नागरीकांनी निष्कापणा न करात प्रतिबंधात्मक योजनांचा अवलंब करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/863099880867994/

Protected Content