ईलेक्ट्रीक डीपीच्या शार्टसर्कीटमुळे कंपनीत आग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरातील व्ही-सेक्टरमधील धिरू पॉलीमर कंपनीत ईलेक्ट्रीक डीपीच्या शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आग लागल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुरूवार १५ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव एमआयडीसीतील व्ही सेक्टरमध्ये धिरू पॉलीमर्स प्रायव्हेट कंपनी आहे. या कंपनीत ठिंबक नळ्या व पाईप तयार केले जातात. कंपनीच्या बाजुला असलेल्या भींतीजवळ महावितरण कंपनीचे ईलेक्ट्रीक डीपी आहे. १४ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ईलक्ट्रीक डी.पी.वर शार्टसर्कीटमुळे कंपनीतील ठिंबक नळ्यांनी पेट घेतला होता. यात कंपनीतील १५ टन प्लास्टिक नळ्यांचा सामान, कच्चा माल, मशिन व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. या आगीत लाखो रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गुरूवारी १५ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

Protected Content