गोदरी महाकुंभात संत मोरारीजी बापूं यांचा सत्संग

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  बंजारा व लबाना नागडा समाज महाकुंभमध्ये राष्ट्रीय संत मोरारीजी बापू हे दि. २७ जानेवारी रोजी येणार असून त्याच दिवशी दुपारी दोन वाजता त्यांच्या सत्संग राहणार आहे.

 

गोदरी येथे होणाऱ्या बंजारा व लबाना नायकडा समाज महाकुंभ कार्यक्रमाला येण्यासाठी गुजरातचे राष्ट्रीय संत परमपूज्य मोरारीजी बापू यांची तारीख घेण्यासाठी महाकुंभ समितीचे प्रमुख गेले होते त्यांनी २७  जानेवारीची तारीख दिली असून त्या रोजी दुपारी दोन वाजता मोरारीजी बापू यांचा सत्संग होणार आहे. बंजारा समाजाला एकत्र करण्यासाठी शुभ आशीर्वाद व योग्य दिशा मिळण्याबाबत बापुजींचा मार्गदर्शन होणार आहे.  परमपूज्य मोरारीजी बापू यांना महाकुंभ कार्यक्रमात येण्यासाठी निमंत्रण देण्यात आले. यावेळी बंजारा व लबाना नायकडा समाज महाकुंभ समितीचे संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज , श्याम चैतन्य जी महाराज , सर्व चैतन्य जी महाराज, सत्यम जी राय, प्रचारक धर्म जागरण गुजरात प्रांत, जयंती भाई चंद्रा, भरत भाई, रामेश्वर नाईक आदी यावेळी उपस्थित होते.

 

Protected Content