‘गझलयात्री भाग ३’ करिता गझल पाठवण्याच्या आवाहन

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी |  गझल मंथन साहित्य संस्था यांच्या वतीने ‘गझलयात्री भाग ३’ या महिला गझलकार विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील गझलकारांनी त्यांच्या सर्वोत्कृष्ट तीन गझल पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गझल मंथन साहित्य संस्थेच्या प्रकाशन विभागाव्दारे महाराष्ट्रातील महिला गझलकारांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रकाशक तथा संपादक जयवंत वानखडे,यांच्या संपादनात  प्रातिनिधिक गझलसंग्रह मालिकेतील तिसरा प्रातिनिधिक गझलसंग्रह ‘गझलयात्री भाग -३’ (महिला गझलकारा विशेषांक) प्रकाशित करण्यात येणार आहे. ज्यांना ह्या प्रातिनिधिक संग्रहात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्या सर्वोत्कृष्ट तीन गझल ९९२२६६७६९९ या whatsapp क्रमांकावर दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गझल संकलनाचे कार्य संस्थेच्या

पुणे विभाग सचिव वैशाली माळी करणार आहेत. पाठवलेल्या गझलांपैकी एक किंवा दोन गझल गझलयात्री  विशेषांकासाठी स्विकारण्यात येईल. महिला गझलकारा विशेषांक असल्यामुळे कृपया पुरूष गझलकारांनी गझल पाठवू नयेत. संस्था गझलेच्या प्रचार व प्रसारासाठी सदर विशेषांक ना नफा ना तोटा या तत्वावर प्रकाशित करणार आहे.

त्यामुळे सर्व साहित्यिकांनी व गझल रसिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर  संपादक गझल मंथन प्रकाशन तथा सचिव गझल मंथन साहित्य संस्था जयवंत वानखडे,

खान्देश उप-विभाग प्रमुख ॲड. मुकुंदराव जाधव यांनी केले आहे.

Protected Content